Last Updated on 28 Sep 2021 2:28 AM by Sanjay Patil/Adhorekhit
झुकेरबर्गच्या फेसबुकला टक्कर देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत योजनेला बळ देण्यासाठी मेड इन इंडिया फेसबुक ‘भारतम’ नावाने लाँच झाले असून गुगल प्ले स्टोरमधून ते फ्री डाऊनलोड करता येणार आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने सुमारे २५० चीनी ॲप्स वर बंदी घातल्यानंतर मेड इन इंडिया ॲप्सचा महापूर आला आहे. त्यात आता भारतम सामील झाले आहे. याचा वापर ॲपशिवाय वेबवर सुद्धा करता येणार आहे.

नीरज बिष्ट यांनी हे ॲप आणले असून देशाचे हे पाहिले सोशल नेटवर्किंग ॲप असल्याचा आणि ते अतिशय सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. नीरज यांनी यापूर्वी डिलीव्हरी किंग आणि यास बॉक्स साठी काम केले आहे. आत्तापर्यंत १२ हजार युजर्सनी हे ॲप डाऊनलोड केल्याचे समजते.
या ॲप मध्ये इनबिल्ट व्हिडीओ ॲप दिले गेले असून त्याचे नाव ‘कलाकार’ असे आहे. हे ॲप १५ स्थानिक भाषा सपोर्ट करते. आयओएस साठी ते पुढच्या महिन्यात लाँच होणार आहे. यात फेसबुकची सर्व फिचर्स आहेतच पण त्याशिवाय अन्य जास्तीची फिचर्स सुद्धा दिली गेली आहेत. फेसबुकवर ट्रेडिंग हॅशटॅग दिसत नाहीत ते येथे दिसणार आहेत. त्या हिशोबाने युजर पोस्ट शेअर करू शकतील. शिवाय एकस्प्लोअर, पॉप्युलर,फ्रेंड बनविणे, फॉलो करणे, गेम खेळणे, मुव्ही, प्रोडक्ट खरेदी विक्री मार्केट प्लेस सुद्धा येथे मिळणार आहे.
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून मेड इन इंडिया ॲपला अच्छे दिन आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने गेल्यावर्षी दोनशेहून अधिक चायनीज ॲपवर भारतात बंदी घातली आहे. त्यानंतर मेड इन इंडिया ॲपचा जास्त बोलबाला झाला आहे.
Bharatam
भारतम ॲपला फेसबुकच्या टक्कर मध्ये लाँच करण्यात आले आहे. या ॲपमध्ये ट्रेंडिंग हॅशटॅग पाहिले जावू शकते. सोबत या ॲपमध्ये तुमच्या हिशोबाप्रमाणे पोस्ट शेयर करू शकता. याशिवाय, ॲपमध्ये एक्सप्लोर, पॉप्यूलर पोस्ट सारखे फीचर्स मिळतील. भारतम ॲपचे मुख्य फीचर म्हणजे यात लोकेशननुसार मित्र बनवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
Koo
सध्या कू मोबाइल ॲपमध्ये लाखो युजर्स जोडले आहे. यात नेता पासून अभिनेत्या पर्यंतचा समावेश आहे. या ॲपमध्ये युजर्सं ट्विटरच्या प्रमाणे ट्विट करू शकतात. या ॲपला गुगल प्ले स्टोरेवर ४.६ गुणाची रेटिंग मिळाली आहे. याची साइज २३ एमबी आहे.
Sandes
संदेस ॲपची साइज ३१ एमबी इतकी आहे. या ॲपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवर ४.३ गुणाची रेटिंग मिळाली आहे. संदेस ॲप व्हाट्सॲप प्रमाणे आहे. यात एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन, कॉन्टॅक्ट शेयरिंग, मेसेज स्टाइलिंग, ग्रुप चॅटिंग, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग सारखे फीचर मिळतील.
FAU-G
कॉल ऑफ ड्यूटी आणि बीजीएमआय गेम ला FAU-G गेमकडून जोरदार टक्कर मिळत आहे. फौजी गेम अँड्रॉयड ८ आणि यावरच्या व्हर्जनवर काम करीत आहे. यात तुम्हाला सिंगल प्लेयर वरून डेथमॅच सारखे मोड मिळतील. हा गेम गलवान खोऱ्याच्या जंगलावर आधारित आहे. या गेमची साइज १२४ एमबी आहे.










































































