Last Updated on 03 Oct 2023 1:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बोरगावच्या सुपुत्रांचा येत्या 8 ऑक्टोबर रोजी सत्कार सोहळा होणार असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील व तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
विविध क्षेत्रात उल्लेखानी कार्य केलेल्या व निवड झालेल्या बोरगावच्या सुपुत्रांचा येत्या रविवारी सायंकाळी 6.30 वाजता बोरगाव (ता. वाळवा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्कार सोहळा होणार आहे.
कृष्णा सहकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व जि.प. सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
यांचा होणार गौरव

रोहित रमेश फार्णे (गडचिरोली येथे नक्षलवादी हल्यात उत्कृष्ठ कामगिरी केलेबद्दल केंद्र शासनामार्फत राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त झालेबद्दल)
शिवाणी संतोष वाटेगांवकर (MPSC अंतर्गत नगररचना अधिकारी वर्ग १ राजपत्रित अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल व राज्यात महिलांच्यामध्ये 16 वी आल्याबद्दल)
सौ. मनिषा प्रविण पाटील (MPSC अंतर्गत असिस्टंट पब्लिक प्रोसेक्युटर ग्रुप A पदी गृह विभाग महाराष्ट्र शासन मध्ये निवड रँक 10 वी)
प्राजक्ता अरुण वंजारी (MPSC अंतर्गत नगरपालिका मुख्य अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल)
पूजा अरुण वंजारी (MPSC अंतर्गत सहाय्यक निबंधक सह. संस्था पदी निवड झाल्याबद्दल)
रणजित भरत वंजारी (MPSC अंतर्गत जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल)
सविता रणजित शिंदे (महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती (MAHAGENECO) केंद्रात सुरक्षा अधिकारी या पदी EWS प्रवर्गातून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांकाने निवड झाल्याबद्दल)
शिवलिला आबासाहेब वंजारी (MPSC अंतर्गत राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) या पदावर निवड झाल्याबद्दल)
पृथ्वीराज अविनाश शिंदे (इस्त्रो चंद्रयान-3 मध्ये सहभाग झाल्याबद्दल)
प्रा. डॉ प्रमोद बाबासो सलगर (शिवाजी विदयापीठ अंतर्गत सिव्हील इंजिनियरिंग स्ट्रक्चरल विभागामध्ये पी.एच.डी (PhD) प्राप्त झाल्याबद्दल)
अमोल आकाराम जाधव (भारतीय आयुर्विमा महामंडळ,गोवा मधून विकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल)
सौ. प्रसन्नता अमोल जाधव (‘भारतीय आयुर्विमा महामंडळ, कोल्हापूर मधून विकास अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल)
सुरज सय्यद जमादार (संजय घोडावत इन्स्टिट्युट मध्ये आदर्श शिक्षक म्हणून निवड व दिपस्तंभ फौंडेशनचे यजुर्वेद महाजन सर यांच्या हस्ते सन्मान झाल्याबद्दल)









































































