Last Updated on 21 Oct 2024 8:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांचे सेवानिवृत्त स्वीय सहाय्यक बाळासाहेब सोपान गावडे (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या पार्थिवावर कासेगाव (ता.वाळवा) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी मंत्री आ.जयंत पाटील व राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी दिर्घकाळ स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. एक शांत,संयमी आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते गावच्या सार्वजनिक क्षेत्रातही सक्रिय होते.
त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, मुलगी,पुतण्या,भाऊ परिवार आहे. रक्षा विसर्जन व कार्य विधी बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता कासेगाव येथे होणार आहे. आरआयटीचे प्रा.सचिन गावडे,उद्योजक संग्राम गावडे यांचे वडील,तर डॉ.माणिक गावडे यांचे ते चुलते होत.









































































