Last Updated on 12 Apr 2025 9:59 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | बहे येथील तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र श्री रामलिंग बेटावर टाळमृदूंगाच्या गजरात ‘अंजनीपुत्र हनुमान की जय’ च्या जयघोषात भक्तिपुर्ण वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
पहाटे अभिषेक, महापुजा करण्यात येवून सुर्योदयसमयी सभामंडपात बांधण्यात आलेल्या श्री हनुमानाच्या पाळण्यावर उपस्थित शेकडो भाविकांनी ‘बोला अंजनीपुत्र हनुमान की जय’ या गजरात व टाळमृदूंगाच्या निनादात पुष्पवृष्टी करून हनुमान जयंती उत्सव साजरा केला. जन्मकाळाचे सुश्राव्य किर्तन ह.भ.प. लखन कोकीळ (महाराज) यांनी केले. अभंग व भजन साथ महादेव घोरपडे, अच्युत नावडकर, रोहित कोळी आदींनी केली.
आरतीनंतर उपस्थित महिलांनी पाळणा म्हटला. जयकर पाटील व हणमंतराव आवळेकर यांनी प्रतिवर्षाप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. धैर्यशील पाटील, सौ. हर्षाली पाटील, राजारामबापू पाटील मिलिटरी स्कुलचे विनायक पाटील, सौ. मनीषा बाणेकर-पाटील आदींसह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या उत्सवाचे संयोजन येथील तीर्थक्षेत्र रामलिंग बेट देवस्थान समिती, ह.भ.प.लखन कोकीळ महाराज, रवींद्र बडवे, अशोक बडवे, श्रीराम बडवे, प्रा. मकरंद बडवे, अधिक बडवे, लक्ष्मण बडवे, रोहीत बडवे,समीर बडवे, प्रथमेश बडवे, अपूर्व बडवे, अथर्व बडवे, अनुज बडवे तसेच विश्वस्त बडवे-पुजारी यांनी केले.















































































