Last Updated on 25 Oct 2020 11:17 AM by
बारामतीच्या कृषीकन्येचा अनोखा उपक्रम
सांगली : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सध्या बंद आहेत. बारामती मधील कृषी महाविद्यालय बारामती येथील चतुर्थ वर्षामध्ये शिकणाऱ्या बहे गावांमध्ये राहणाऱ्या संकल्पना पाटील या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांचा भाजीपाला टिकून राहण्यासाठी शून्य ऊर्जा शीत गृह (Zero Energy Cool Chamber ) हा अनोखा उपक्रम बहे येथील शेतकऱ्यांना दाखवला.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शून्य ऊर्जा शीत गृह प्रात्यक्षिक शेतकऱ्यांपुढे दाखवून त्यांना उपक्रमाचे महत्व पटवून देण्यात आले. यामुळे नाशवंत पालेभाज्या, फळभाज्या चार ते पाच दिवस टिकून राहतात आणि शेतकऱ्यांना याचा फायदा नक्कीच होतो असे या विद्यार्थिनिने सांगितले.
सदर प्रात्याक्षिक कु.संकल्पना संजय पाटील या विद्यार्थिनीने लोकडाऊन मध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शेतकऱ्यांसमोर सादर केले. यावेळी सरपंच छायाताई पाटील,कुलदीप पाटील व इतर शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.








































































