Last Updated on 14 May 2024 6:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
महाविद्यालय परिसरात श्रींची महाआरती करत साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा
सांगली । भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयास नॅशनल मेडिकल कमिशन, दिल्ली यांच्याकडून एम.डी.,एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रम मान्यता मिळाल्याने सोमवारी सकाळी महाविद्यालय परिसरात ‘श्री’च्या महाआरतीसह साखर-पेढे वाटप आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नॅशनल मेडिकल कमिशन, दिल्ली यांच्याकडून प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयास सामान्य औषध (एम.डी – ११ ), बालरोग (एम.डी – ५), सामान्य शस्त्रक्रिया (एम.एस.- ६), ऑर्थोपेडिक्स (एम.एस.- ६), नेत्ररोग (एम.एस.-३), प्रसूती आणि स्त्रीरोग (एम.एस.-५ ), ऍनेस्थेसियोलॉजी (एम.डी.-५), रेडिओ डायग्नोसिस (एम.डी.- ४) या विषयांच्या एम.डी., एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून एकूण मान्यता मिळालेल्या ४७ जागा आहेत.यामुळे इस्लामपुर शहरासह सांगली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात भर पडली आहे.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा

इस्लामपूर : प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महाविद्यालयास एम.डी., एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्यानंतर श्रींची महाआरती करताना संजय जाधव, बाजूस निशिकांत भोसले-पाटील,नितीन भोसले-पाटील व अन्य मान्यवर.
मान्यता मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी महाविद्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते ‘श्री’ची महाआरती पार पडली. यावेळी साखर-पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव नितीन भोसले -पाटील, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. भुपाल गिरीगोसावी, संदीप यादव यांच्यासह प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व एल. आर.पी.आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.










































































