Last Updated on 02 Nov 2021 6:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
संक्षिप्त :
२९ विधानसभा मतदार संघांची पोटनिवडणूक : आसाम (पाच मतदारसंघ), पश्चिम बंगाल (चार मतदारसंघ), मध्य प्रदेश (तीन मतदारसंघ), हिमाचल प्रदेश (तीन मतदारसंघ), मेघालय (तीन मतदारसंघ), बिहार (दोन मतदारसंघ), राजस्थान (दोन मतदारसंघ), कर्नाटक (दोन मतदारसंघ), आंध्र प्रदेश (एक मतदारसंघ), हरयाणा (एक मतदारसंघ), महाराष्ट्र (एक मतदारसंघ), मिझोरम (एक मतदारसंघ), तेलंगणा (एक मतदारसंघ)
पोटनिवडणूक : दादरा आणि नगर हवेली, मंडी (हिमाचल प्रदेश) आणि खंडवा (मध्य प्रदेश)
नवी दिल्ली ।
देशातील १४ राज्यांतील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ( पोटनिवडणूक )भाजपला जोरदार झटका बसला आहे. १४ राज्यांत ३ लोकसभा आणि २९ विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी झाली. पश्चिम बंगालमध्ये हातातील दोन जागा मगावल्या तसेच हिमाचल प्रदेशातही भाजपला झटका बसला आहे.काँग्रेसलाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत.मध्यप्रदेश, आसाम और तेलंगना या तीन राज्यांत भाजपला थोडासा दिलासा मिळाला आहे.
भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरलेली दादरा आणि नगर हवेली मतदारसंघात कमलाबेन डेलकर यांनी ५१ हजार मतांनी विजय मिळविला आहे.मध्यप्रदेशात विधानसभेच्या दोन जागांवर भाजप तर एका जागेवर काँग्रेस विजयी झाले आहे.राजस्थानमध्ये काँग्रेसने दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे.बिहारमध्ये जेडीयूने कुशेश्वर स्थान आणि तारापूरच्या जागा खिशात टाकत राजदला झटका दिला.
पश्चिम बंगालमध्ये दिनहाटा, शांतीपूर, गोसाबा आणि खरदा या चारही जागांवर भाजपला धूळ चारत तेथे तृणमूल काँग्रेसने विजयी पताका फडकावली.
लोकसभा पोटनिवडणूक निकाल
दादरा नगर हवेली – शिवसेना विजयी
खंडवा (मध्य प्रदेश) – भाजप विजयी
मंडी (हिमाचल प्रदेश) – काँग्रेस विजयी
विधानसभा पोटनिवडणूक निकाल
आसाम
गोसाईगाव – भाजप
भबानीपूर – भाजप
तमूलपूर – भाजप
मरियानी – भाजप
थोवरा – भाजप
बिहार
कुशेश्वर अस्थान – जेडीयू
तारापूर – जेडीयू
हरयाणा
एलीनाबाद – इंडियन नॅशनल लोक दल (INLD)
हिमाचल प्रदेश
फतेहपूर – काँग्रेस
अर्की – काँग्रेस
जुबल-कोटखई – काँग्रेस
पश्चिम बंगाल
दिनहाटा – तृणमूल काँग्रेस
शांतीपूर – तृणमूल काँग्रेस
खरदाहा – तृणमूल काँग्रेस
गोसाबा – तृणमूल काँग्रेस
मध्य प्रदेश
पृथ्वीपूर – भाजप
रायगाव (एससी) – काँग्रेस
जोबाट (एसटी) – भाजप









































































