Last Updated on 09 Apr 2025 6:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत असून गुरुवारी १० एप्रिल रोजी महादेव मंदिर पेठ येथे सकाळी 10 वाजता जनतेची कैफियत समजून घेतली जाणार आहे. या अभियानात सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.
माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत,आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, सागर खोत उपस्थित राहून जनतेची कैफियत जाणून घेणार आहेत. या शिबिरांमध्ये पुरवठा विभाग (रेशन कार्ड),पोलीस स्टेशन, तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, महावितरण, तहसीलदार, प्रांत,या कार्यालयाकडील प्रलंबित कामे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अन्य विषयाबाबत लेखी स्वरुपात तक्रारी व प्रस्ताव घेण्यात येणार आहेत. आणि जाग्यावर तक्रारी व कामाचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे.
तरी पेठ महसूल मंडलातील पेठ, माणिकवाडी, नेर्ले, महादेववाडी, रेठरे धरण, मरळनाथपूर, सुरूल, ओझर्डे, नायकलवाडी या गावातील सर्व ग्रामस्थांनी एक दिवसीय शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. सदाभाऊ खोत, आ. सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, सागर खोत यांनी केले आहे.








































































