Last Updated on 14 Jul 2022 5:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा शिंदे सरकारने घेतला आहे.आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलवर 5 रूपये आणि डिझेलवर 3 रूपये अशा प्रकारचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.कर कपातीचा निर्णय आज ( 14 जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल.
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली.या बैठकीत शिंदे सरकारने 9 मोठे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीसोबत ठाकरे सरकारने रद्द केलेल्या काही निर्णयांमध्ये बदल केला आहे.
सहा हजार कोटी रूपयांचा भार शासनाच्या तिजोरीवर पडेल.मात्र, सहा हजार कोटी रूपयांच्या भारेतून जनतेला मोठा दिलासा मिळेल.हा एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे.ट्रान्सपोर्टमुळे झालेली वाढ त्यामुळे वस्तूंवरील किंमती देखील वाढल्या होत्या. मात्र, आता पेट्रोलमध्ये 5 रूपये कमी केल्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
बूस्टर डोससाठी राज्यात संपूर्ण यंत्रणा उभी करणार
शुक्रवारपासून पुढील 75 दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दिली. या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी काल चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जनजागृती करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ च्या धर्तीवर राज्यात देखील स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून शाश्वत घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तीक घरगुती शौचालय आणि सामुदायिक शौचालय बांधण्याचा निर्णय राबवण्यात येणार आहे, असं शिंदे म्हणाले.












































































