Last Updated on 10 Nov 2020 3:12 PM by
थोड्याफार वेदना झाल्या की पॅरासिटेमॉलची गोळी घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. परंतु ही गोळी अधिकवेळा घेतल्यास आपल्या शरीरावर तिचे काय परिणाम होतात याचे भान फार कमी लोकांना आहे. थोडे डोके दुखले की घ्या पॅरासिटेमॉल असा काही लोकांचा धडाकाच असतो. दुकानात तर ही गोळी डॉक्टरची चिठ्ठी न नेता मिळू शकते. परंतु ही गोळी मनमानी आणि सातत्याने घेतली तर यकृतावर तिचे वाईट परिणाम होतात असा इशारा यकृततज्ञांनी दिला आहे.
पॅरासिटेमॉलचा परिणाम यकृतातील एका रसायनावर होतो. हे रसायन रोगप्रतिकारक असते. मात्र सातत्याने पॅरासिटेमॉल घेतले की हे रोगप्रतिकारक द्रव्य संपून जाते आणि गोळ्या घेणार्यांना यकृतातल्या बिघाडाचे अनेक रोग व्हायला लागतात. यकृत बाधित होऊ शकते. आपल्या देशामध्ये डोके दुखणारे आणि गुडघे दुखणारे तसेच संधिवाताने त्रस्त असलेले लोक अशा वेदनाशामक गोळ्या सातत्याने घेत असतात.













































































