Last Updated on 07 Nov 2024 4:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । पुणे विभागातून दिवाळीत सोडलेल्या नियमित आणि जादा बसमधून १५ लाख जणांनी प्रवास केला. त्यामधून पुणे विभागाला जवळपास १८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
दिवाळीत पुणे एसटी विभागाकडून नियमित आणि खडकी येथील मैदानातून जादा बस सोडण्यात आल्या. यंदा ५५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले होते. विभागातील १३ आगारांतून ८८० जादा बस सोडल्या होत्या.
एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीकडे प्रवासी मोठ्या संख्येने वळले आहेत. अजूनही पुढील आठ दिवस ही गर्दी कायम राहणार आहे.दरम्यान, भाऊबीजेच्या दिवशी पुणे विभागातून १ लाख ५१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून एसटीला दोन कोटी १० हजारांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या दहा दिवसांतील ही सर्वाधिक प्रवासी संख्या ठरली. असे पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.











































































