Last Updated on 05 Feb 2025 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पक्ष आणि सरकार यामधील समन्वय साधण्यासाठी जिथे भाजपाचे पालकमंत्री नाहीत त्या सतरा जिल्ह्यांमध्ये भाजपानं जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केले आहेत.
सरकार आणि भाजप संघटनेत समन्वय साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नवे पद तयार करण्यात आली आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात ‘संपर्कमंत्री’ नियुक्त केले जात आहेत. महायुतीमधील पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे नवे पद निर्माण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संपर्कमंत्र्यांची नेमणूक करून भाजपने अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.
डॉ पंकज भोयर गोंदिया जिल्ह्याचे, आकाश फुंडकर बुलडाण्याचे, अशोक उईके यवतमाळचे तर राधाकृष्ण विखे-पाटील वाशिमचे संपर्कमंत्री असणारआहेत. अतुल सावे यांना छत्रपती संभाजीनगर, पंकजा मुंडे यांना बीड तर, जयकुमार गोरे यांना धाराशिव, मेघना बोर्डीकर यांना हिंगोली तर गिरीश महाजन यांना जळगावचं संपर्कमंत्री पद देण्यात आलं आहे. जयकुमार रावल यांना नंदुरबार, मंगलप्रभात लोंढा यांना मुंबई शहर , गणेश नाईक यांना ठाणे, आशिष शेलार यांना रायगड त्याचप्रमाणे नितेश राणे यांना रत्नागिरी, शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा, माधुरी मिसाळ यांना कोल्हापुर तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण कुठे संपर्कमंत्री?
गोंदिया – पंकज भोयर
बुलढाणा – आकाश फुंडकर
यवतमाळ – अशोक उईके
वाशिम – राधाकृष्ण विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
धाराशिव – जयकुमार गोरे
हिंगोली – मेघना बोर्डीकर
नंदुरबार – जयकुमार रावल
ठाणे – गणेश नाईक
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
जळगाव – गिरीश महाजन
संभाजीनगर- अतुल सावे
पुणे- चंद्रकांत पाटील
कोल्हापूर- माधुरी मिसाळ
रत्नागिरी-उदय सामंत













































































