Last Updated on 04 Dec 2024 8:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पर्यटकांना आता आकाशातून पाहता येणार अयोध्येचे अप्रतिम दृश्य
अयोध्या । वॉटर मेट्रो बोटीनंतर आता अयोध्येत हॉट एअर बलूनची सेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या संकल्पनेतून अयोध्येत सुरू झालेली ही सेवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प बनला आहे. यात बसल्यानंतर पर्यटकांना २५० फूट उंचीवरून अयोध्येचे भव्य दृश्य पाहता येणार आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी नया घाट हेलिपॅड येथे झाले.
अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांचा एक भाग म्हणून आता येथे एअर हॉट बलून सुरू करण्यात आला आहे.
अयोध्या विकास प्राधिकरण आणि पुष्पक ॲडव्हेंचर यांच्या मदतीने हे काम सुरू आहे. अयोध्येत साहसी खेळांच्या माध्यमातून पर्यटन उपक्रम वाढवून तरुण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉट एअर बलूनचे उद्घाटन सदरचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, विभागीय आयुक्त गौरव दयाल आणि अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष अश्विनीकुमार पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. याच्या १० मिनिटांच्या प्रवासाचे भाडे ९९९ रुपये आहे. यामध्ये एका वैमानिकासह केवळ चारच जण एकत्र बसू शकतील.











































































