Last Updated on 03 Mar 2025 8:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जुनागढ : ‘जागतिक वन्यजीव दिना’निमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील ‘गिर वन्यजीव अभयारण्यात’ जंगल सफारीचा आनंद घेतला आणि आशियाई सिंहांना जवळून पाहिले.
येथे पंतप्रधान मोदी डीएसएलआर कॅमेऱ्याने सिंहांचे फोटो काढताना दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये, पंतप्रधान मोदी हातात कॅमेरा घेऊन सिंहांकडे पाहत आहेत. एक चित्र देखील आहे ज्यामध्ये एक मादी सिंहीण एका बछड्याला मिठी मारताना दिसते.
जंगल सफारी दरम्यान पंतप्रधान मोदी वेगळ्याच अंदाजात दिसले. डोक्यावर टोपी आणि हातात कॅमेरा असलेल्या पंतप्रधानांचा लूक पाहण्यासारखा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगल सफारीचे काही फोटो समोर आले आहेत. या दरम्यान त्यांची भेट एका सिंहाशीही झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गीरमध्ये सफारीला गेले, जे भव्य आशियाई सिंहाचे अधिवास म्हणून प्रसिद्ध आहे.
X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की: “आज सकाळी, जागतिक वन्यजीव दिनी, मी गीरमध्ये सफारीला गेलो, आपल्या सर्वांना माहित आहे की ते भव्य आशियाई सिंहाचा अधिवास आहे,; गीरमध्ये आल्याने मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. गेल्या अनेक वर्षांत, सामूहिक प्रयत्नांमुळे आशियाई सिंहांची संख्या सातत्याने वाढत आहे.आशियाई सिंहांचे अधिवास जपण्यात आदिवासी समुदाय आणि आसपासच्या भागातील महिलांची भूमिका तितकीच कौतुकास्पद आहे.”
एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: “गेल्या दशकात वाघ, बिबटे, गेंडे यांची संख्याही वाढली आहे, यावरून आपण वन्यजीवांना किती महत्त्व देतो आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी काम करत आहोत हे दिसून येते.















































































