Last Updated on 05 Oct 2024 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाशीम | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिम येथे स्वतः नगारा वादन करण्याचा अनुभव घेतला. महान बंजारा संस्कृतीत नगाऱ्याला विशेष स्थान आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
X या समाज माध्यमावरील चित्रफीत संदेशात पंतप्रधानांनी लिहिले :
“वाशिममध्ये, बंजारा संस्कृतीत विशेष स्थान असलेल्या नगारा वादनाचा आज स्वतः अनुभव घेतला. आगामी काळात ही संस्कृती अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. या संतांनी समाज सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
X या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी लिहिले:
“वाशिममध्ये बंजारा समाजातील आदरणीय संतांची भेट घेतली. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.”









































































