Last Updated on 05 Jan 2024 7:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद केलेल्या भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.
भोगावती नदी – कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक 8 ते 9 जानेवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.
पंचगंगा नदी – कार्यवाहीचा भाग- पंचगंगा नदीवरील शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तिरावरील भागात दिनांक 10 ते 11 जानेवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.
उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही. आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976,कलम 51(3) व 97 मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.









































































