Last Updated on 04 Nov 2024 3:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील जनतेने विकासाची स्वप्ने पाहीली,आता स्वप्ने दाखविणार्यांना नको ती स्वप्ने पडु लागली आहेत.खर्या अर्थाने येथील जनतेला,सार्वजनिक सुविधा मिळाल्या नाहीत, ही लढाई आपल्या न्याय हक्काची आहे,परिवर्तनासाठी कोणत्याही दबावाला व अमिषाला बळी पडु नका असे मत इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निशिकांत भोसले-पाटील यांनी इस्लामपूर शहरातील प्रभागनिहाय संपर्क दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केदार पाटील प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेली ३५ वर्षे ज्यांनी सत्ता भोगली. त्यांनी केलेली विकासकामे व मी कोणतेही मंत्रिपद नसताना माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे याचा आपण विचार करावा. विद्यमान आमदारांनी इस्लामपुरातील जनतेला आजपर्यंत फक्त बारामतीचे स्वप्ने दाखवली. पण सत्यात काही उतरले नाही. येथील मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. मी माझ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली. मी तुमच्या सेवेसाठी नेहमी तत्पर आहे. तुमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला एक संधी द्या. मी तुम्हाला शब्द देतो की, येणाऱ्या पाच वर्षात २४ बाय ७ पाणी योजना, स्ट्रीट लाईट, अंडर ग्राउंड ड्रेनेजसह बारामती पेक्षा ही चांगला विकास तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही सर्व माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशीला, यात मला कोणतीच शंका नाही.
यावेळी इस्लामपूर शहरातील महायुती घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निशिकांतदादांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांनी इस्लामपूर शहरात प्रभागनिहाय संपर्क दौरा केला. त्यांनी नागरिकांशी भेटून संवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. येत्या पाच वर्षांत शहरातील समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयार केला असून हे शहर समस्यामुक्त करणार असल्याचे निशिकांतदादा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी निशिकांतदादांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचा निर्धार यावेळी केला.









































































