Last Updated on 28 Nov 2025 7:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या मतदारसंघात पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तरी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव, विटा या नगरपरिषदा तसेच आटपाडी आणि शिराळा या नगरपचांयतींच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
हेही वाचा – नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागू राहणार आहे. निवडणूक होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































