Last Updated on 02 Nov 2021 6:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
नकली बिस्किटे विकून नागरिकांना फसविणाऱ्या डोंबिवलीतील एका भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अश्विनीकुमार शुक्ला असे अटक केलेल्या भामट्याचे नाव असून त्याच्याकडून 9 नकली बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत.
आरोपी अश्विनीकुमारने प्रवासी बनून एका रिक्षा चालकाला नकली सोन्याचे बिस्किट 50 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी मानपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केले.









































































