Last Updated on 13 Aug 2025 3:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आज आपण अशा एका योद्ध्याच्या जीवनप्रवासाचा सन्मान करतो आहोत, ज्याचं नाव घेताच आपल्या मनात धैर्य, शौर्य आणि निस्वार्थ देशसेवेची प्रतिमा उभी राहते ती म्हणजे प्रकाश खोत.
प्रकाशरावांनी आपल्या तरुणपणातील सुवर्णकाळ देशासाठी अर्पण केला. रणांगणावर गोळ्यांच्या वर्षावात उभं राहणं, दहशतवाद्यांच्या कारवायांना तोंड देणं, नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीमा राबवणं हे त्यांच्यासाठी केवळ नोकरी नव्हती, ती होती शपथ.
वादळ, पाऊस, बर्फ, कडाक्याची थंडी किंवा प्रखर ऊन, कोणतीही अडचण त्यांच्या कर्तव्यावर कधीच परिणाम करू शकली नाही.
आपण सणासुदीला दिवाळीत फटाके फोडले, गणपतीत ढोल वाजवले, आणि घरातल्या शांततेचा आनंद घेतला, तो या सैनिकांच्या त्यागामुळेच. कारण ते त्या क्षणी देशाच्या बर्फाळ सीमेवर, शत्रूच्या नजरेत डोळा डोळ्यात घालून उभे होते. प्रकाश खोत म्हणजे फक्त सैनिक नाहीत, ते शौर्य, शिस्त आणि सेवाभाव याचं जिवंत उदाहरण आहेत. रणांगणावर लढताना त्यांनी सिद्ध केलं की सैनिक फक्त शस्त्रानेच नाही, तर बुद्धी, धैर्य आणि चातुर्यानेही लढतो.
आजचा दिवस अभिमानाचा आहे, पण थोडा भावनिकही. कारण आता त्यांचं रणांगण बदलेल.
आता आदेश देणारे असतील खोत मॅडम. आधी देशाची सीमा सांभाळली, आता घराची ‘किचन सीमा’ सांभाळायची. आधी बंदुकीची सफाई, आता कपाटं आणि फॅनची सफाई. आधी “परेड”, आता ‘दूध आण’ मिशन.
पण खरं सांगायचं, तर सैनिक कधीच खरं निवृत्त होत नाही. गणवेश उतरला तरी त्याचं शौर्य, त्याची देशभक्ती आणि त्याचा सेवाभाव कायम जिवंत राहतो. प्रकाशरावांचं नाव ऐकलं की डोळ्यात अभिमानाने पाणी येतं, आणि मनापासून एकच शब्द बाहेर पडतो — सलाम.
प्रकाशराव, तुम्ही देशासाठी लढलात, आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात नाती जपून, मित्र सांभाळून, हसतमुख राहूनही तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा असाल.
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

अमोल अलका अरुण पवार
इस्लामपूर, जि. सांगली
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 09 Feb 2026 8:49 AM by Sanjay Patil/Adhorekhit ✦ भारताचे धोरण वचनबद्धतेवर आधारित, तडजोडीवर नाही ✦ भारतीय कृषी उत्पादनांना अमेरिकेत ‘शून्य आयातशुल्क’ बाजारपेठ उपलब्ध होईल ✦ भा... Read more















































































