Last Updated on 30 Sep 2021 2:39 AM by Sanjay Patil/Adhorekhit
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची माहिती
सांगली : धनगर समाज आरक्षण प्रश्नांसह अन्य महत्वपूर्ण प्रश्नांवर रविवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पुणे येथील भारती विद्यापीठ,धनकवडी येथे महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या सर्व राज्य संघटना प्रमुख,राज्यातील आजी व माजी आमदार , खासदार यांच्या सह राज्यभरातील निमंत्रीत धनगर समाजाच्या पदाधिकारी यांची ऐतिहासिक गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनगर समाजाचे राज्याचे जेष्ठ नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिली .
सदर ऐतिहासिक गोलमेज परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज संघटनेचे राज्य प्रमुख,विद्यमान व माजी आमदार,खासदार यांना निमंत्रीत केले असुन कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमिवर राज्यातील प्रमुख मान्यवरांनाच सदरच्या परिषदेसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे .
कोरोना साथिच्या आजाराचे सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून,सामाजिक आंतर ठेवून,मास्क व सॅनिटायझर चा वापर करून सदरच्या परिषदेचे प्रमुख व निमंत्रीत मान्यवरांच्या उपस्थितमध्ये आयोजन करण्यात आले आहे .गेली अनेक वर्षे प्रलंबीत असणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नांसह अनेक निरनिराळ्या समाजाच्या प्रश्नांवर चर्चा व विचार विनिमय,आगामी धोरणा बाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन व निर्णय होणार आहेत.तरी सदरच्या गोलमेज परिषदेस निमंत्रीत मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केले आहे.
![]()











































































