Last Updated on 01 Oct 2021 2:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय
मराठी सिनेविश्वात विनोदाचा धमाका करणाऱ्या ‘दे धक्का’ चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.महेश मांजरेकर व सुदेश मांजरेकर दिग्दर्शित दे धक्का या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्या विनोदाने सजलेल्या या चित्रपटाचा दुसरा पार्टही यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
![]()

‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली !!! १ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ या आशयाचे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे. लवकरच ‘दे धक्का २’ भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.
२००८ मध्ये ‘दे धक्का’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हॉलिवूडमधील २००६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केले होते. त्यानंतर आता दे धक्का २ हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ‘दे धक्का २’मध्ये काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. ‘दे धक्का ‘ चित्रपटातील सर्व कलाकार ‘दे धक्का २’ मध्येही झळकणार आहेत. यावेळी कथा लंडनमध्ये घडताना दिसून येणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटासाठी फारच उत्सुक झाले आहेत.












































































