Last Updated on 23 Nov 2021 8:11 PM by Sanjay Patil/Adhorekhit
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा
नवी दिल्ली |
रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी आज पर्यटक सर्किट ट्रेन्स संकल्पना आधारित भारत गौरव रेल्वेगाड्या (ट्रेन्स) सुरू करण्याची घोषणा केली.या रेल्वेगाड्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणे भारतातील आणि जगातील पर्यटकांना दाखवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी साकार करण्यास मदत करतील असे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या मुख्य क्षमतांचा फायदा पर्यटन सर्किट ओळख पटवण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि भारताच्या विशाल पर्यटन क्षमतेचा फायदा करून घेण्यासाठी संकल्पना-आधारित ट्रेन चालवून केला जाईल असे ते म्हणाले.














































































