Last Updated on 26 Jan 2022 3:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीतील राजपथावर देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपथावर देशाची ताकद आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद,संरक्षण मंत्री आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. शिवाय लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदल प्रमुख पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजपथ येथे राष्ट्रीय ध्वज फडकाविला.
भारताच्या राष्ट्रगीताने #RepublicDay च्या सोहोळ्याला सुरुवात होताच संपूर्ण राजपथावर देशभक्तीचा उत्साह भरून राहिला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजपथ येथे राष्ट्रीय ध्वज फडकाविला.#RepublicDayIndia#RepublicDay2022
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 26, 2022
.@crpfindia ची भक्कम तुकडी आणि बँड पथसंचलन करताना..#RepublicDay पथसंचालनात अचूकता आणि उल्हास #RepublicDayIndia #RepublicDay2022#RepublicDay2022pic.twitter.com/P630kTr9Sj
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 26, 2022
राजपथावर स्त्री शक्तीचे प्रदर्शन, 73 व्या #RepublicDay संचलनात @indiannavy च्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट प्रीती यांनी केले
चित्ररथात नौदलाच्य 1946च्या उठावाचेही दृश्य, हा उठाव देशाच्या स्वातंत्र्यालढ्याला प्रेरणा देणारा ठरला#RepublicDayIndiapic.twitter.com/GnoCytxair
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 26, 2022
राजपथावर चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन
राजपथावर देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ देखील सहभागी झाला आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन झाले.महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखरू, मोर तसेच विवीध अभयारण्यातील दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती अशी जैवविविधता दाखवणारा चित्ररथ आपल्याला राजपथावर होणाऱ्या संचलनात पाहायला मिळाला. या चित्ररथाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला आहे.
बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकलवरील थरारक प्रात्याक्षिक
बीएसएफच्या महिला जवानांची मोटार सायकल प्रात्याक्षिक, सीमा भवानी यांनी त्याचं नेतृत्त्व केलं.
जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्व सांगणारा चित्ररथ
जलजीवन मिशन मंत्रालयाच्या वतीनं पाण्याचं महत्तवं सांगणारा चित्ररथ सादर करण्यात आला. सीआरपीएफनं सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा असणारा चित्ररथ सादर केला. तर, विधी व न्याय मंत्रालयानं सर्वांसाठी समान न्याय असल्याचं दर्शन घडवणारा चित्ररथ दाखवला.
इंडिया पोस्टच्या चित्ररथामध्ये महिला सशक्तीकरणाच्या प्रेरणेचा उत्सव साजरा करण्यात आला.गेल्या 75 वर्षांमध्ये भारतीय टपाल खात्याने विकसित केलेली सशक्त संपर्क यंत्रणा आणि आधुनिक सुविधांचे दर्शन या चित्ररथाद्वारे घडले.
सीमा सुरक्षा दलातील 33 महिला अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक समतोल साधत बहुप्रतिक्षीत मनोरा रचून दाखविला.
सीमा सुरक्षा दलातील 33 महिला अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक समतोल साधत बहुप्रतिक्षीत मनोरा रचून दाखविला #RepublicDay #RepublicDayIndia #RepublicDay2022@BSF_Indiapic.twitter.com/tJOuY8G89Y
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 26, 2022
प्रजासत्ताक दिनाचं सर्वात मोठं आकर्षण
73 व्या #RepublicDay च्या संचलनाची @IAF_MCC च्या अतिशय शानदार आणि दिमाखदार अशा फ्लाय पास्टने सांगता#AzadiKaAmritMahotsav निमित्त 75 विमानांनी केलेले फ्लायपास्ट म्हणजेच विमानाची थरारक प्रात्यक्षिके प्रेक्षकांना रोमांचित करणारी!
#RepublicDayIndia pic.twitter.com/Fgx0UxNKoA— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 26, 2022
आजच्या प्रजासत्ताक दिनाचं सर्वात मोठं आकर्षण राहिलं ते समारोपाला पार पडलेला फ्लायपास्ट. भारतीय वायूदलाच्या 75 लढाऊ विमानांनी नेत्रदीपक कसरती करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लायपास्टची सुरुवात हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी झाली. सुरुवातीला सारंग हेलिकॉप्टर्सनी शिस्तबद्ध हवाई संचलन करत आकाशात तिरंगा ध्वज तयार केला. त्यानंतर एएलएच, अपाचे , चिनूक, एमआय-17 आणि एमआय 35 या हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती केल्या. त्यानंतर 1971च्या युद्धाच्या आठवणी जागवण्यासाठी भरारी घेतली ती डकोटा विमानांनी. या व्हिटेज विमानांचं 1971 च्या युद्धात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर तीन हरक्यूलिस विमानांनी उपस्थितांना श्वास रोखायला लावला. त्यानंतर सूपरसॉनिक वेगात आलेल्या सुखोई, मिग, राफेल, जग्वॉर या विमानांनी वेगवेगळे फॉर्मेशन्स करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लाय पास्टची सांगता जॉग्वॉर विमानांच्या कसरतींनी पार पडली. बालाकोट उध्वस्त करणाऱ्या जॅग्वॉर विमानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आकाशात 75 चा आकडा तयार करून अनोखी सलामी दिली.
भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनतर राष्ट्रगीतानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं करण्यात आलेल्या संचलनाचा समारोप करण्यात आला.












































































