Last Updated on 02 Jun 2023 12:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
येथे पाहा निकाल…
link वर क्लिक करा
👇👇👇👇
अधोरेखित ऑनलाईन डेस्क । इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज,म्हणजेच 2 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका 14 जून रोजी दुपारी 3 वाजल्यापासून त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येतील.निकाल लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा? याचा सविस्तर तपशील जाणून घेऊया.
आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाईल.यावेळी शिक्षण विभागाकडून राज्यातील निकालाची टक्केवारी जाहीर केली जाईल.तसेच किती विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले? राज्याचा एकूण निकाल किती लागला? परिमंडळ निहाय निकाल किती लागला? याची माहिती शिक्षण विभागाकडून दिली जाईल.त्यानंतर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन कर्ज…
निकाल लागल्यानंतर गुणपडताळणीसाठी 3 जून ते 12 जून हा कालावधी देण्यात आला आहे.त्याचबरोबर छायाप्रतीसाठी 3 जून ते 22 जून या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरावे लागणार आहे.उत्तरपत्रिकांच्या पुनर्मुल्यांकनासाठीदेखील मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन कर्ज करायचा आहे.पण त्याआधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करावयाचा आहे.पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये होणार आहे.पुनर्परिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ७ जून पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.
दहावी परीक्षेचा निकाल कसा पाहायचा?

कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या
येथे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी महाराष्ट्र एसएससी बोर्डाचा निकाल 2023 पाहू शकतात…
🌑 दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
🌑 दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
🌑 तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)
🌑 दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
🌑 निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध होतील
विद्यार्थी पुढील वैकल्पिक वेबसाइटवरून त्यांचा MH SSC निकाल 2023 तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.![]()









































































