Last Updated on 09 Nov 2021 10:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारतीय अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी सज्ज
या दौऱ्यासाठी प्रियांक पंचालकडे कर्णधारपदाची धूरा,तर शॉ,पड्डीकललाही संधी
मुंबई ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात भारत अ संघाला तीन चार दिवसीय कसोटी सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी गुजरातच्या प्रियांक पंचालकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.यावेळी सर्व युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
२३ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून तिन्ही चार दिवसीय कसोटी सामने ब्लोएमफॉन्टेन येथे होणार आहे. पहिला सामना २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. तसेच २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान दुसरा आणि ६ ते ९ डिसेंबरदरम्यान तिसरा सामना होणार आहे.भारताचा वरिष्ठ संघ 17 डिसेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे.
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संघात स्थान देण्यात आले आहे. पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि राहुल चहर यांनाही संधी देण्यात आली आहे. खराब फॉर्ममुळे पृथ्वी भारतीय संघाबाहेर होता. नवदीप सैनी आणि सरफराज खान यांनाही दक्षिण आफ्रिकेत जाण्याची संधी देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघ
प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उम्रान मलिक, इशान पोरेल आणि अरजान नावासवाला
कोण आहे प्रियांक पांचाल?
या दौऱ्यात कर्णधारपद सोपवण्यात आलेला प्रियांक पांचाल कोण आहे. याबद्दल अनेकांना माहिती नाही. तर 31 वर्षीय प्रियांक हा मूळचा गुजरातचा असून तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने 98 प्रथम श्रेणी सामन्यात 6 हजार 891 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 45.63 च्या सरासरीने 24 शतकं ठोकली आहेत. याशिवाय लिस्ट ए सामन्यात प्रियांकने 40.19 च्या सरासरीने 2 हजार 854 धावाही केल्या आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दौरा
- पहिला कसोटी सामना- 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, ब्लोमफॉन्टेन
- दुसरा कसोटी सामना- 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, ब्लोमफॉन्टेन
- तिसरा कसोटी सामना- 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर, ब्लोमफॉन्टेन










































































