Last Updated on 13 May 2023 2:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । थॅलेसेमिया आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.
या उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये राज्यातल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह देशातल्या दहा नामांकित रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत 2017 पासून थॅलेसेमिया बाल सेवा योजना राबवली जात असून, नुकताच मार्च, 2023 मध्ये या योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे.









































































