Last Updated on 16 Nov 2021 7:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलकढी हे आज मालवणी खाद्यसंस्कृती मधलं विशेष आकर्षण.पण आता ही सोलकढी पिण्यासाठी तुम्हाला कोकणात जायची गरज नाही कारण आम्ही घेऊन आलोय या सोलकढीची सोप्पी रेसिपी खास तुमच्यासाठी…
साहित्य
अर्धी वाटी खवलेला नारळ, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, मीठ, कोथिंबीर.
कृती
सर्वप्रथम खोबरे, हिरवी मिरची, आणि आलं लसूण पेस्ट एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्या. नंतर थोडे थोडे पाणी घालून या नारळाचा रस गाळणीमधून गाळून घ्या. या नारळाच्या रसात चवीनुसार मीठ आणि कोकम आगळ टाकून ढवळा. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अशाप्रकारे तुमची आवडती सोलकढी तयार आहे.
फायदे
- पचन क्रियेत मदत करते.
- उन्हाळ्यात एक उत्कृष्ट घरगुती थंड पेय.
- पौष्टिक आणि आरोग्यवर्धक.
टीप : आवडत असल्यास आपण याला जिरा-राईची फोडणी सुद्धा देऊ शकतो.














































































