Last Updated on 22 Oct 2021 5:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
एक योग्य वास्तू तुमच्या जीवनात बराच मोठा बदल घडवू शकते. यात तुमच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे समाधान आहे. तुमचे घर व कार्यस्थळ थेट तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात. या दोन ठिकाणांपैकी कुठलाही वास्तुदोष तुमच्या जीवनात परिणामकारक ठरेल. तिथेच तुमची समस्या सुरु होते आणि तिथेच तुम्हाला त्या समस्येवरील उपाय मिळतील. जर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करण्यास सुरुवात झाली असेल, तर प्रमुख बदलांसाठी पुढे जाण्याअगोदर, तुमच्या घराची वास्तुची प्रथम तपासणी करा. तुमच्या घरासाठी एक योग्य वास्तु हे तुमचे भाग्य सुधारण्यासाठी व तुमच्या संपत्तीमध्ये वृद्धी आणण्यासाठीचे तुमचे पहिले पाऊल असू शकते.
स्वयंपाकघरासंबंधी उपाय
अन्न ही मुलभूत गरज असून यामुळे एखाद्या जीवाचं आरोग्य सुदृढ राहतं. दक्षिण पश्चिम दिशा आपल्या स्वयंपाकगृहासाठी अचुक आहे.आपल्या मतानुसार आपण स्वयंपाक गृहाची दिशा बदलवू शकत नसाल तर, अग्नि देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपला गॅस, शेगडी पूर्व दिशेने ठेवा.स्वयंपाकगृह आणि बाथरूम एकाच भिंतीला लागून नसावे याची दक्षता घ्या.
झाडांशी संबंधीत उपाय
वास्तुशास्त्रानुसार घरातल्या आतील झाडं किंवा रोपं आपल्या घरात शांतता आणि शुद्ध हवा पसरवतात. चांगलं आरोग्य आणि चिंता मुक्त जीवनासाठी तुळशीचं रोप लावा.तुम्हाला चांगली झोप लागावी याकरीता बेडरूम मध्ये लैवेंडर चं रोप लावू शकतात, हा सर्वात चांगला प्रकृतीचा तनाव रहीत उपाय आहे.जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहेंदी आणि कोळीचे वनस्पती लावा.
तिजोरीचे स्थान
तुम्ही तुमची पैशाची तिजोरी कधीही बीमखाली ठेवू नका, कारण त्यामुळे आर्थिक चणचण निर्माण होते. प्राधान्याने तुमच्या लॉकरची दिशा ही कुबेरच्या दिशेनुसार म्हणजेच उत्तर दिशेने असावी. परंतु तुमच्या घराच्या स्थानानुसार व घरातील प्रमुख व्यक्तीच्या जन्मदिनांकाच्या आधारावर, तिजोरी विशिष्ट दिशेने ठेवावी.
आरशाचे स्थान
दुसरा उपाय म्हणजे तुमच्या तिजोरीसमोर एक आरसा ठेवा, ज्यात तुमच्या तिजोरीची प्रतिमा दिसेल. हे तुमचा पैसा दुफ्पट झाल्याचे प्रतीक आहे.
एक मासेघर ठेवा व पक्षांना खाऊ घाला
तुमच्या घरात एक मछलीघर (ऍक्वेरिअम) ठेवा. ते तुमच्या घरातील विविध वास्तूदोष सुधारण्यास मदत करते. सकारात्मक ऊर्जा प्राफ्त करण्यासाठी ऍक्वेरिअम स्वच्छ व हवायुक्त राहील हे निश्चित करा. सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी तुमच्या अंगणात पक्ष्यांना धान्य व पाणी देखील द्यावे.
गळणाऱ्या नळाची दुरुस्ती
तुटलेला किंवा गळणारा नळ हा तोटा किंवा पैशांच्या नासाडीचे प्रतीक आहे. म्हणून तुम्हाला पाण्याची व पैशांची नासाडी थांबविण्यासाठी लवकरात लवकर त्या नळांची दुरुस्ती किंवा तो बदलण्याची आवश्यकता आहे.
मुख्य दरवाजा आकर्षक ठेवा
वास्तुशास्त्रामध्ये मुख्य दरवाजाला महत्वाचे स्थान आहे. यातूनच संपत्तीसह अनेक गोष्टींचा प्रवेश व निर्गमन होते. तुमच्या जीवनात समृद्धी व संपत्ती सहजतेने आकर्षित होण्यासाठी तुमचा मुख्य दरवाजा सजविण्याची शिफारस केली जाते. वास्तुनुसार संपत्ती आकर्षित करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. कुटुंब प्रमुखाच्या शूभ दिशा व घराच्या स्थानासोबतच घरातील फर्निचर असलेल्या जागेच्या आधारे आणखी अनेक पद्धती आहेत. सरळ वास्तुमधील तज्ञ वैज्ञानिकदृष्टय़ा तुमची मदत करु शकतात आणि तुमच्या घराच्या माध्यमातून तुमची संपत्ती वाढविण्यात तुमची मदत करु शकतील असे अनेक मार्ग तुम्हाला सांगतील.
फक्त ही पाच झाड लावा आणि मिळवा सुख समृद्धि धन दौलत ऐश्वर्य
पहिले झाड – तुळस

हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळसी एवढं पवित्र झाड कोणताही नाही आणि म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घराच्या समोर तुळशीचं झाड तुळशीचे रोप अपल्याला लावलेली दिसतात आणि ते असायलाच हवं .तुमच्या सुद्धा घरासमोर तुळशी असेल तर या तुळशीची नित्यनेमाने पूजा करवि केवळ झाड लावून काही फायदा नाही .तुळस की विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते म्हणजेच भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि म्हणून जर तुम्ही तर रोज तुळशीची पूजा केली आणि जर सायंकाळी तुम्ही तुळशीला एक दिवा प्रज्वलित केला तर तो तुपाचा असेल तर सर्वोत्तम तर अस केल्याने तुळस अपल्याला प्रसन्न होते आणि विश्णु ही प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी चा आर्शिवाद अपल्याला मिळतो.ज्या ठिकाणी भगवान प्रसन्न होतात त्याठिकाणी माता लक्ष्मी आपली पावले आपोआपच येतात तर तुळशीचं झाड नक्की लावा लवकर पैसा हवा आहे त्यांनी उत्तर दिशेला तुळशीचं झाड पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा.
दूसरे झाड – केळीच झाड

दुसरे झाड घरासमोर असतं त्यात त्या घरामध्ये नेहमी मनःशांती मिळते त्या लोकांना सुखसमाधान मिलते एक पवित्र वातावरण निर्माण होतं तिचं वातावरण निर्माण होण्यासाठी केळीचे केळीचे झाड मदत करत .
हे झाड आपण पूर्व व उत्तर दिशेला लावावा पूर्व उत्तर दिशा म्हणजे मराठी मधील ईशान्य दिशा त्या ठिकाणी झाडं लावायला हव या झाडामुळे महालक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं.
तिसरे झाड – शमीचे झाड

शमीचे झाड हे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते राजस्थानात शमीचे झाड ‘खेजडी’ म्हणून ओळखले जाते.हिंदू धर्मात शमी वृक्ष अतिशय पवित्र मानला जातो. शमी वृक्ष हे इंग्रजी मध्ये प्रोसोपिस सिनेनारिया या नावाने ओळखले जाते. हे झाड हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते.शमीचे झाड हे प्रत्येक प्रकारचा दोष नष्ट करण्या साठी याचा वापर केला जातो त्याच्या पाठीमागे शनि दोष आहे किंवा राहु दोष कुंडलीमध्ये अशा लोकांनी शमीचे झाड आपल्या घरासमोर नक्की जावक तुमच्या घरा समोर हे झाड असेल तर उपाय नक्की करा दररोज सायंकाळी या शमीच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करा त्याच्या खोड आहे त्या खोडाशी एक मोहरीच्या तेलाचा दिवा दररोज सायंकाळी तुम्हाला रिझल्ट किती लवकर तुम्ही श्रीमंतीचा पायऱ्या चढत आहात खूप लवकर दौलत तुमच्याकडे आकर्षित होईल.
चौथे झाड – पांढरी रुई

पांढरी रुई चे झाड दोन प्रकारची असते तर त्यापैकी पांढऱ्या रुईचे झाड हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरासमोर लावू शकता म्हणजे खूप लवकर पैसे मिळवा असे वाटत असेल किंवा अचानक धनलाभाचे अपेक्षा आहेत मोठे घबाड सापडले नोकरीमध्ये मोठी प्रमोशन व्हावे तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणात पैसा यावा अशा लोकांनी पांढरी रुई ही आपल्या घरासमोर नक्की लावावी तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला लावू शकता आणि फक्त धनलाभ होतो असं नव्हे तर तुमचा शत्रूंवर विजय मिळवून देण्याचं काम हे झाड करतं तसेच त्यांना वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये भांडण होतात त्यांच्या मध्ये एकोपा नसतो अशा लोकांनी सुद्धा या पांढऱ्या रुईचे झाड लावलं तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय पती पत्नी मधील प्रेम त्यामुळे वृद्धिंगत होतो.
पाचवे झाड- मनी प्लांट

आजकाल बाजार मध्ये मनी प्लांट मोठ्या प्रमाणात मिळतात मात्र लक्षात ठेवा मनी प्लांट लावताना ते खरेदी करूनच घ्यावे व लावावे व शेजाऱ्याच्या कोणालाही आपले मानी प्लांट चे झाड देउ नये. व त्या लोकांना ते समजू नये असे लावावे . मनी प्लांट कधीही दुसऱ्या च्या बगिच्यातून घेऊन आपल्या घरात लावू नये याचाने त्याची दरिद्री तुमच्या घरात घुसू सकते.जे मनी प्लांट असतो जर आपल्या घरामध्ये लावला तर त्यामुळे प्रगती खूप वेगाने होते अशा कुटुंबात अशा कुटुंबांमध्ये नेहमी पती-पत्नीमध्ये सौख्य राहते कुटुंब कधीही तुटत नाही. है झाड नेहमी हिरवेगार राहायला हवं ते ते कधीही सुखी होऊ देऊ नये हे मनी प्लांट पैसा मिळवून देत असत पण त्याचबरोबर समाजामध्ये मोहा मान-सन्मान प्राप्त होतो त्या परिवार तुम्हाला समाजामध्ये एक मोठा मानाचं स्थान मिळवून देण्याचं काम हे मनी प्लांट करत असतं
(टीपःया लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त,कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा)










































































