Last Updated on 20 Nov 2021 11:03 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.राज्यात आयात करणाऱ्या दारूवर (scotch whisky ) उत्पादन शुल्क तब्बल 50 टक्क्यांनी कपात करण्यात आला आहे.राज्य सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.आयात करण्यात आलेल्या स्कॉचवरील उत्पादन शुल्क 50 टक्के कमी केले आहे.या निर्णयामुळे इतर राज्यात असलेल्या दारूच्या किंमती राज्यातली किंमती एक समान असणार आहे.
आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या कपातीनंतर व्हिस्कीची विक्री एक लाख बाटल्यांवरून अडीच लाख बाटल्यांवर जाण्याचा अंदाज आहे.
स्कॉच तस्करीला आळा बसेल
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुल्क कमी केल्यामुळे, इतर राज्यांमधून स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसेल. अबकारी करात कपात केल्यामुळे महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. बातमीनुसार, सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात. शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांपर्यंत पोहोचू शकते.
सर्वाधिक महसूल दारूमधून येतो
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. महाराष्ट्रात आयात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केली आहे.आता महाराष्ट्रातील मद्यप्रेमींना कमी किमतीत आयात स्कॉच मिळू शकणार आहे.










































































