Last Updated on 11 Jul 2023 8:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यात बाबत आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे.तलाठी भरतीच्या अर्जात चुक दुरूस्तीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे
संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी 26 जून 2023 रोजी वृत्तपत्रात तसेच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येवून पदभरती सुरू करण्यात आलेली आहे.शासनाकडील निर्देशांनुसार सर्व सदर पदभरतीकामी समन्वयाचे कामकाज भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात येत आहे.26 जून 2023 पासुन सुरू झालेल्या तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने वृत्त प्रसिद्ध झालेले असून सदर वृत्तामध्ये तलाठी भरतीच्या अर्जात चुक दुरूस्तीची सुविधा नसल्याबाबत नमूद केलेले आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,26 जून 1023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तलाठी पदाकरीता आवश्यक अर्हता,आवश्यक कागदपत्र,अर्ज सादर करण्याची पद्धत,इत्यादीबाबत सविस्तर सुचना नमुद केलेल्या आहेत त्याचप्रमाणे अर्जदारास नोंदणी (Registration) प्रक्रियेवेळी तसेच प्रत्यक्ष अर्ज भरुन झाल्यानंतर सादर (Submit) करण्यापूर्वी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत खात्री करण्याकामी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
हेही वाचा – तब्बल 28 वर्षांनी एकत्र आलेल्या सवंगड्यांनी घेतला ‘मैत्री बँक’ सुरू करण्याचा निर्णय
त्यामुळे सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपूर्ण जाहिरात व सविस्तर सूचना व्यवस्थितपणे वाचून समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपूर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे.तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जदाराने शुल्क भरून अर्ज सादर (Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही.
लक्षणीय दिव्यांगत्व उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयी सवलती…
लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिक व इतर सोयी सवलती उपलब्ध करून देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,लेखनिक मिळणेबाबत अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.सबब याव्दारे सर्व उपायुक्त (महसूल), सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व तहसिलदार यांना कळविणेत येते की,या कार्यालयामार्फत आपलेकडे पाठविणेत आलेले प्रस्ताव तसेच आपलेकडे प्राप्त झालेले प्रस्तावाबाबत उक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने आपले स्तरावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणेत यावी.तसेच त्याबाबत संबंधित अर्जदार यांना देखील कळविणेत यावे.आपले कार्यालयाकडे प्राप्त झालेले दिव्यांग उमेदवारांचे अर्जाची माहिती या कार्यालयास आपले कार्यालयाच्या ईमेलवर पाठविणेत आलेल्या गुगलशीट मध्ये भरून सादर करावी.
ही आहे नवीन महत्वाची अपडेट PDF मध्ये
👇👇👇👇
अर्ज दुरुस्ती मागणीबाबत प्रसिध्दीपत्रक
परिपत्रक दिव्यांगत्व लेखनिक मागणी अर्ज स्विकृती बाबत







































































