Last Updated on 14 Apr 2025 5:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेच्या फटकाऱ्याने देशातील उच्च-निचता,जातीयता नेस्तनाबूत केली आहे. त्यांनी टाटा-बिर्ला यांना एक मत,आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीलाही एका मताचा एकसारखा अधिकार दिला. डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेला समानतेचा अधिकार ही मोठी देणगी आहे,असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे काढले.
आ.जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इस्लामपूर येथील ऐतिहासिक कचेरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रा.शामराव पाटील,अरुणभाऊ कांबळे,देवराज पाटील,विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील,शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव,अरुणादेवी पाटील,मुनीर पटवेकर,सुभाषराव सुर्यवंशी,सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने,शहराध्यक्षा पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी महिला सफाई कामगारांना साडी वाटप,तर डॉ. नरसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजारामबापू नाट्यगृह परिसरातील महामानव रांगोळी पाहण्यात आली. तसेच इस्लामपूर आगारमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास राज्य घटनेच्या माध्यमातून अभिव्यक्ती व व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून हजारो वर्षांची वर्ण व्यवस्था मोडीत काढून सर्वाना समान हक्क दिला आहे. काही मूठभर लोकांनी समाजात जातीयता,उच्च-निचता लादून स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते. त्यांचे वर्चस्व राज्य घटनेने संपविल्याने या लोकांना राज्य घटनेबद्दल काहीशी असूया वाटणे स्वाभाविक आहे. मात्र आपल्या देशात राज्य घटनेस मानणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव किती आहे? हे गेल्या लोकसभा निवडणुकीत देशाने पाहिले आहे. कोणी काही म्हणाले,तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेल्या राज्य घटनेप्रमाणे आपला देश पुढील कित्येक वर्षे चालणार आहे.
याप्रसंगी विजयराव यादव, आनंदराव पाटील, संजय बनसोडे, डॉ.दिलीप सावंत, शंकरराव चव्हाण, विवेक कांबळे, राजकुमार कांबळे, शैलेश सुर्यवंशी, सागर कांबळे, गोपाळ नागे, विलास ताटे, कमल पाटील, रोझा किणीकर, संदीप पाटील, सी.व्ही.पाटील, संग्राम फडतरे, डॉ.योजना शिंदे-पाटील, डॉ.संग्राम पाटील, हणमंत माळी, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, दिग्विजय पाटील,अभिजित रासकर,आदिनाथ चौधरी, सुप्रिया कांबळे, मालन वाकळे, शैलजा जाधव, प्रतिभा पाटील, मनिषा पेठकर, संजय खवळे, जंबु पांढरबळे, सुहास हांडे, संदीप माने, शकील जमादार यांच्यासह इस्लामपूर आष्टा शहरासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









































































