Last Updated on 17 Oct 2021 2:17 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली :
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा आता भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.सध्या राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहत आहे.याशिवाय द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे.
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपनंतर संपत आहे. टी २० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.
यासह, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची जागा घेतील, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.










































































