Last Updated on 31 Oct 2021 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पणजी |
क्रीडा जगतात दमदार कामगिरी बजावल्यानंतर टेनिसपटू लिएंडर पेस यांने आता राजकारणात दुसरी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी लिएंडरने टीएमसीत प्रवेश केला.
यावेळी लिएंडरचे पक्षात स्वागत करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, लिएंडरने टीएमसीत प्रवेश केला असून त्याच्या या निर्णयाचा विशेष आनंद झाला. लिएंडर माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.
येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे. अभिनेत्री नफीसा अली पाठोपाठ टेनिसपटू लिएंडरच्या टीएमसी प्रवेशामुळे गोव्याच्या राजकारणात सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेण्यास टीएमसीला यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.













































































