Last Updated on 30 Jun 2020 2:52 AM by
भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक
भारत सरकारने भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर घेतला हा निर्णय
दिल्ली : लडाखमध्ये सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव आहे.या तणावादरम्यान भारत सरकारने मोठा निर्णय घेत चीनला झटका दिला आहे. भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर घातली बंदी आहे.यात टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अॅप्लिकेशनचा समावेश आहे. मोदी सरकारने सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अॅपविषयी दिल्यानंतर केंद्राने ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे टिकटॉक अॅपचे आहेत.टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचे सांगण्यात येते. तर हेलो अॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत.वुई मेट, शेअर इट,युसी ब्राउजर्स,क्लब फॅट्री,युसी न्यूज,झेंडर,लाइक,सीएम ब्राउजर्स,शीन,न्यूजडॉग,वंडर कॅमेरा,कॅम स्कॅनर,क्लिन मास्टर-चिता मोबाइल,फोटो वंडर क्यूक्यू प्लेअर,स्वीट सेल्फी, हेलो,\यू व्हिडिओ,मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.
चिनी कंपन्यांवर भारत सरकारची करडी नजर
भारताशी ज्या देशांच्या भौगोलिक सीमा जोडलेल्या आहेत अशा शेजारी देशांमधील गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारची मंजुरी देशात बंधनकारक करण्यात आली आहे. या निर्णयाद्वारे केंद्र सरकारने चिनी कंपन्यांना भारतात अव्वाच्या सव्वा गुंतवणूक करण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.चीन हळू हळू गुंतवणूक करुन भारतीय कंपन्या ताब्यात घेण्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रयत्नांची जाणीव होताच केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलली आहे. या पाठोपाठ चिनी अॅपवर बंदी घालून चीनची आणखी कोंडी करायला सुरुवात केली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी

१. टिकटॉक (TikTok)
२. शेअर इट (Share it)
३. क्वाई (Kwai)
४. यूसी ब्राउझर (UC Browser)
५. बैदु नकाशा (Baidu map)
६. शीन (Shein)
७. क्लॅश ऑफ किंग्ज (Clash of Kings)
८. डीयू बॅटरी सेव्हर (DU battery saver)
९. हेलो (Helo)
१०. लाइक (Likee)
११. यूकॅम मेकअप (YouCam makeup)
१२. मी समुदाय (Mi Community)
१३. सीएम ब्राउझर (CM Browers)
१४. व्हायरस क्लिनर (Virus Cleaner)
१५. एपीयूएस ब्राउझर (APUS Browser)
१६. रॉमवे (ROMWE)
१७. क्लब फॅक्टरी (Club Factory)
१८. न्यूजडॉग (Newsdog)
१९. ब्यूट्री प्लस (Beutry Plus)
२०. वी चॅट (WeChat)
२१. यूसी न्यूज (UC News)
२२. क्यूक्यू मेल (QQ Mail)
२३. वेइबो (Weibo)
२४. झेंडर (Xender)
२५. क्यूक्यू म्यूझिक (QQ Music)
२६. क्यूक्यू न्यूजफीड (QQ Newsfeed)
२७. बिगो लाइव्ह (Bigo Live)
२८. सेल्फीसिटी (SelfieCity)
२९. मेल मास्टर (Mail Master)
३०. पॅरालल स्पेस (Parallel Space)
३१. मी व्हिडिओ कॉल – शाओमी (Mi Video Call – Xiaomi)
३२. वी सिंक (WeSync)
३३. ईएस फाइल एक्सप्लोरर (ES File Explorer)
३४. व्हिवा व्हिडिओ – क्यू व्हिडिओ इंक (Viva Video – QU Video Inc)
३५. मीटू (Meitu)
३६. विगो व्हिडिओ (Vigo Video)
३७. न्यू व्हिडिओ स्टेटस (New Video Status)
३८. डीयू रेकॉर्डर (DU Recorder)
३९. व्हॉल्ट – हाईड (Vault- Hide)
४०. कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ (Cache Cleaner DU App studio)
४१. डीयू क्लिनर (DU Cleaner)
४२. डीयू ब्राउझर (DU Browser)
४३. हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स (Hago Play With New Friends)
४४. कॅम स्कॅनर (Cam Scanner)
४५. क्लीन मास्टर – चित्ता मोबाइल (Clean Master – Cheetah Mobile)
४६. वंडर कॅमेरा (Wonder Camera)
४७. फोटो वंडर (Photo Wonder)
४८. क्यूक्यू प्लेयर (QQ Player)
४९. वी मीट (We Meet)
५०. स्वीट सेल्फी (Sweet Selfie)
५१. बैदु ट्रान्सलेट (Baidu Translate)
५२. व्ही मेट (Vmate)
५३. क्यूक्यू इंटरनॅशन (QQ International)
५४. क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर (QQ Security Center)
५५. क्यूक्यू लाँचर (QQ Launcher)
५६. यू व्हिडिओ (U Video)
५७. व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ (V fly Status Video)
५८. मोबाइल लिजेंड्स (Mobile Legends)
५९. डीयू प्रायव्हसी (DU Privacy)
Post Views: 1,265