Last Updated on 26 Oct 2021 2:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा
मुंबई ।
देशातील आघाडीची वाहनिर्मिती कंपनी टाटा मोटर्सने देशातील १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क उभारले असून महामार्गावर दहा हजार स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे.कंपनीचे जवळपास १० हजार घरगुती ईव्ही चार्जिंग पॉईंट्स आहेत,ज्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे लोक आपल्या गाड्या अगदी सहज व अतिशय सुविधाजनक पद्धतीने चार्ज करू शकतात.
टाटा पॉवर ईझेड चार्जर्स इको सिस्टीम, सार्वजनिक, कॅप्टीव्ह, बस फ्लीट व होम चार्जर्सची संपूर्ण रेंज कव्हर करत असून सर्वप्रथम कंपनीने मुंबईत चार्जर्स लावणे सुरु केले होते. त्यानंतर आता देशातील १८० शहरात ही योजना राबविली जात असून त्या अंतर्गत १० हजार चार्जिंग स्टेशन्स देशातील राज्यमार्ग ई हायवे बनविण्यासाठी सक्षम केले जात आहेत.
यासाठी कंपनीने एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म व मोबाईल आधारित अॅप जारी केले असून ते ईझेड चार्ज नावाने ओळखले जाते. त्यावरून चार्जिंग स्टेशनचा पत्ता मिळू शकतो तसेच चार्जिंगचे ऑनलाईन बिल भरता येते. जुलै २०२१ मध्ये टाटाने एचपीएल बरोबर देशभर अनेक शहरात प्रमुख मार्गावर एचपीसीएल रिटेल आउटलेट, पेट्रोल पंपावर इव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी हातमिळवणी केली होती.
पुणे मुंबई साठी लोढा ग्रुप बरोबर सहकार्य करार केला गेला आहे तसेच इंडीयन ऑइल, एमजीएल, आयजीएल व अन्य राज्य सरकारांना सक्रीय सहयोग देण्याबद्दल बोलणी केली आहेत असे सांगितले जात आहे.












































































