Last Updated on 19 Jul 2021 4:43 PM by
…होतील अनेक आरोग्यदायी फायदे !
मुंबई : भारतीय स्वयंपाकघरामध्ये पुदिन्यापासून चटणी (pudina chatani) तयार केली जाते. पुदिन्याचा (Mint)वास खूप छान येतो. पुदिन्याचा वापर केल्यामुळे अन्नामध्ये चांगली चव येते आणि अन्नाचा स्वाद वाढतो. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, लोह, फायबर, मेन्थॉल, प्रथिने, कार्बोहायड्रेट, मॅंगनीज, कॉपर, अँटी-व्हायरल, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि औषधी गुणधर्म असतात. पुदिन्याचे सेवन केल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. पुदिन्याच्या पानांमध्ये प्रोटीन आणि चांगले फॅटही असतात. पुदिन्याचे सेवन केल्यामुळे अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यास मदत होते. रात्री झोपेच्या आधी पुदिन्याचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे. आज आपण पुदिन्याचे फायदे आणि पुदीन्याचा चहा तयार करण्याचा हे जाणून घेणार आहोत
पुदिन्याचा चहा करण्यासाठी लागणारी सामग्री
पुदिन्याची पानं – 10
मिरी पूड – अर्धा चमचा
काळं मीठ – अर्धा चमचा
पाणी – दोन कप
पुदिन्याचा चहा असा तयार करा
– पुदिन्याचा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
– या पाण्यामध्ये पुदिन्याची पानं, काळं मीठ, मिरी पूड टाका.
– पाच मिनिटांपर्यंत हे पाणी चांगले उकळू द्या. अशा पद्धतीने चहा तयार होईल.
– हा चहा गाळणीने गाळून घ्या आणि झोपण्यापूर्वी प्या.
पुदीन्याचा चहा रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यामुळे शरीराला विश्रांती मिळते. त्यामुळे तुम्हाला झोप चांगली येते.
पचन –
रात्रीचा पुदिन्याचा चाहा प्यायल्यामुळे तुमच्या पाचन तंत्राचे कार्य चांगले होते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. गॅस, अपचन, पित्त, पोट दुखी यासारख्या समस्या होत नाहीत.
श्वसनातून दुर्गंधी –
पुदिना विशेषत: माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतो. पुदिना तोंडात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. अशाप्रकारे श्वसनातून दुर्गंधी येण्याचू समस्या उद्भवत नाही.
मासिक पाळी दरम्यानच्या वेदना –
मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना पोटात असह्य वेदना होतात. यावेळी पुदिन्याचा चहा पिणे खूपच फायदेशीर असते. पुदिन्याचा चहा प्यायल्यामुळे मासिक पाळी दरम्यान पोटातील असह्य वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.











































































