Last Updated on 25 Nov 2021 7:49 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे भरती करण्यात आले आहे.अण्णा हजारे यांना छातीत दुखू लागल्याने आज सकाळी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अण्णा यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.
दरम्यान,मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.











































































