Last Updated on 14 Jan 2024 7:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
लवकरच या योजनेचा निघणार शासन निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई । ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबवित असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री योजना’ सुरू करण्यात येत आहे,लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.
दहिसर येथील आजी-आजोबा उद्यानास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत,अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.














































































