Last Updated on 22 Nov 2021 10:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी करोना संसर्गामुळे निधन झाले. त्या ५८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
माधवी यांच्या पश्चात पती आणि विवाहित मुलगी आहे. माधवी गोगटे यांनी मराठीसोबत हिंदी मनोरंजनक्षेत्रातही अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढूंढ लेंगी मंझिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटके कमालीची गाजली. ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली.










































































