Last Updated on 01 Oct 2022 4:45 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली व कोल्हापूर जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित
पुणे,रायगड,ठाणे,सिंधुदुर्ग,जळगाव झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित
मुंबई । राज्यातील सुमारे 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचेआरक्षण जाहीर झाले आहे.ग्रामविकास विभागाने 30 सप्टेंबर रोजी याबाबतचा शासकीय निर्णय जाहीर केला आहे.यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), तर पुणे झेडपीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला यांच्यासाठी राखीव झाले आहे.
ग्रामविकास विभागाच्या या निर्णयामुळे झेडपीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग त्या कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. एकीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.आता आगामी काळात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत सुरु आहे.ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा,प्रभाग रचनेचा मुद्दा,राज्यातील सत्तांतर त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.आगामी दोन ते तीन महिन्यात राज्यात निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांचे जिल्हानिहाय आरक्षण पुढील प्रमाणे
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण
नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
नगर : अनुसूचित जमाती
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)
पुणे : सर्वसाधारण
सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली : सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)
औरंगाबाद : सर्वसाधारण
बीड : अनुसूचित जाती
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती
जालना : नागरिकांचा मागास प्रवर्ग
लातूर : सर्वसाधारण( महिला)
हिंगोली : सर्वसाधारण (महिला)
अमरावती : सर्वसाधारण (महिला)
अकोला : सर्वसाधारण (महिला)
यवतमाळ : सर्वसाधारण
बुलढणा : सर्वासाधारण
वाशिम : सर्वसाधारण
नागपूर : अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
चंद्रपूर : अनुसूचित जाती (महिला)
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागास प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)











































































