Last Updated on 31 Mar 2025 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर एक नवाच क्रेझ पाहायला मिळतोय – आणि तो म्हणजे ‘जिब्ली’! सोशल मीडियावर ‘जिब्ली’च्या’ प्रतिमा, व्हिडिओ आणि आर्टवर्कचा अक्षरशः महापूर आला आहे. चाहत्यांनी ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि रेडिटसारख्या प्लॅटफॉर्मवर ‘जिब्ली’च्या प्रेमात गढून गेलेली पोस्ट्स शेअर करायला सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर ‘जिब्ली’ प्रेमाचा महापूर आला आहे. चाहते मोठ्या प्रमाणावर ‘जिब्ली’ थीम असलेली आर्टवर्क, मेम्स आणि गिफ्स शेअर करत आहेत. मात्र, या ट्रेंडमध्ये सामान्य लोकांसोबतच राजकीय नेतेही मागे नाहीत!
जिब्लीच्या सौंदर्यशास्त्राने आता केवळ चाहत्यांनाच नाही, तर अनेक राजकीय नेत्यांनाही आकर्षित केलं आहे. काही नेत्यांनी त्यांच्या फोटोचे ‘जिब्ली’ स्टाइल एडिट्स सोशल मीडियावर पोस्ट केले, तर काहींनी थेट जिब्ली चित्रपटांमधील विचारधारा आणि सौंदर्यशास्त्राचा उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये केला.
जिब्ली क्रेझ वाढणारच!
‘जिब्ली’ प्रेम आता सामान्य चाहत्यांपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वत्र पोहोचलं आहे. इंटरनेटवर सुरू असलेल्या या नव्या लाटेला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय रंग चढू लागला आहे. येत्या काळात हा ट्रेंड अधिक विस्तारेल यात शंका नाही!













































































