Last Updated on 01 Feb 2024 8:51 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | जानेवारी, 2024 (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत) मध्ये सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)महसूल संकलन 1,72,129 कोटी रुपये इतके झाले आहे, जे गेल्या वर्षीपेक्षा 10.4% वाढ दर्शवते. जानेवारी 2023 मध्ये (31.01.2023 रोजी संध्याकाळी 5:00 पर्यंत) 1, 55,922 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक मासिक संकलन आहे आणि या आर्थिक वर्षात तिसऱ्यांदा 1.70 लाख कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संकलन झाले आहे. सरकारने आयजीएसटी संकलनातून सीजीएसटी ला 43,552 कोटी रुपये आणि एसजीएसटी ला 37,257 कोटी रुपये अदा केले आहेत.
एप्रिल 2023-जानेवारी 2024 या कालावधीत, एकत्रित सकल जीएसटी संकलनात (31.01.2024 च्या संध्याकाळी 5:00 पर्यंत) गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6 टक्के वाढ झाली आणि ते 16.69 लाख कोटींवर पोहोचले.मागील वर्षी याच कालावधीत 14.96 लाख कोटी रुपये जीएसटी महसूल जमा झाला होता.
खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो.ही आकडेवारी आज संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंतची (म्हणजे 31.01.2024) आहे. महिन्याचे अंतिम संकलन याहून अधिक असेल.
Chart: Trends in GST Collection












































































