Last Updated on 29 Oct 2021 3:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मोबाईल फोन स्लो चार्ज होण्याच्या समस्येने अनेकदा आपण सगळेच त्रस्त असतो. कधी-कधी लोकांना फोन चार्जिंगला लावून तासन्तास थांबावे लागते.अशा परिस्थितीत आपला बराच वेळ वाया जातो.असे काही उपाय आहोत,ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल फोन जलद चार्ज करू शकता.
Original चार्जर वापरा
तुमचा मोबाईल पटकन चार्ज करण्यासाठी तुम्ही नेहमी Original चार्जर वापरावा.अनेकदा असे दिसून येते की जेव्हा आपण फोनमध्ये दुसरा चार्जर वापरतो,अशा स्थितीत फोन स्लो चार्ज होतो.या कारणास्तव,फोन जलद चार्ज करण्यासाठी नेहमी मूळ चार्जर वापरा.असे केल्याने तुमच्या फोनची बॅटरीही दीर्घकाळ टिकते.
Aeroplane Mode चालू करणे
जर तुम्हीही मोबाईलच्या स्लो चार्जिंगच्या समस्येने त्रस्त असाल तर फोन चार्ज करताना तुम्ही तुमच्या फोनचा एअरप्लेन मोड चालू करावा. एअरप्लेन मोड ऑन केल्यानंतर फोन जलद चार्ज होतो.
Bluetooth, GPS आणि Wifi बंद करा
जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन जलद चार्ज करायचा असेल,तर तुम्ही फोन चार्ज करण्याआधी ब्लूटूथ,जीपीएस आणि वायफाय बंद करा.असे केल्याने फोन अधिक वेगाने चार्ज होतो.
चार्जिंग करताना तुमचा फोन वापरू नका
तुमचा फोन चार्ज होत असताना फोन वापरू नका.असे केल्याने मोबाईल स्लो चार्ज होतो.
चार्ज करताना फोन बंद करा
जर तुमचा फोन खूप हळू चार्ज होत असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा फोन बंद करून चार्जमध्ये ठेवावा. असे केल्याने फोन जलद चार्ज होतो. वर नमूद केलेल्या उपायांनंतरही तुमचा फोन जलद चार्ज होत नसेल, तर तुमच्या फोनचा जॅक किंवा चार्जर खराब असण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी तुम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचा फोन आणि चार्जर दाखवा.










































































