Last Updated on 17 Feb 2021 3:50 PM by
…तर देवी लक्ष्मीची आपल्यावर राहील सदैव कृपादृष्टी
आपल्या हातावरील रेषा आपल्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जातात. हात पाहणारे लोक याच रेषा पाहून आपल्याविषयी सर्वकाही सांगू शकतात. धन (money), संपत्ती,आयुष्य,लक्ष्मीची कृपा,रोजगार यासह इतरही माहिती हस्तरेषांमध्ये लपलेली असते. हातावर ज्या रेषा आणि खुणा असतात त्याही याच गोष्टींकडे निर्देश करतात. जाणून घेऊया अशा खुणांबद्दल ज्या देवी लक्ष्मीची कृपादृष्टी दर्शवतात.
स्वस्तिक
ज्या लोकांच्या हातावर स्वस्तिकाचे चिन्ह असते ते अतिशय भाग्यवान असतात. फारच कमी लोकांच्या हातावर हे चिन्ह असते. हे चिन्ह धनधान्य आणि सुखी जीवनाचे प्रतीक असते.
त्रिशूल
काही लोकांच्या हातावर त्रिशूलाचे चिन्ह असते. हे शंकराचे चिन्ह आहे आणि या लोकांवर भगवान शंकराची कृपादृष्टी असते. जर हे चिन्ह मंगळ पर्वतावर असेल तर ते फारच शुभ मानले जाते.
कमळ
हातावर कमळाचे चिन्ह अतिशय लाभदायक असते. अशा लोकांवर विष्णूच्या सोबतच देवी लक्ष्मीचीही कृपा असते. या लोकांच्या घरात पैशांची कमतरता कधीही जाणवत नाही.
मंदिर
हातावर मंदिराचे चिन्ह फारच कमी लोकांच्या नशिबात असते. हे चिन्ह उच्चपदाच्या प्राप्तीचे प्रतीक आणि योग आणते. ज्या लोकांच्या हातावर हे चिन्ह असते ते धर्म आणि अध्यात्माप्रति जास्त रुची दाखवतात.
खड्ग
ज्या लोकांच्या हातावर खड्गाचे चिन्ह असते त्यांच्यावर देवीदेवतांची विशेष कृपा असते. हे लोक आयुष्यात खूप सफल होतात आणि यशाचे उदाहरण लोकांसमोर ठेवतात.










































































