Last Updated on 10 Dec 2023 3:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या माध्यमातून 765 दिव्यांग व्यक्तिंना 1 कोटी 5 लाख रुपयांची विविध उपकरणे व साहित्याचे वाटप केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे केले.यावेळी त्यांच्या आमदार फंडातून 10 लाख रुपयांच्या श्रवण यंत्राचे 90 व्यक्तींना वाटप करण्यात आले. तसेच अभियानच्या माध्यमातून इस्लामपूर व आष्टा शहरातील छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्या 100 व्यक्तींना 6 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रा.शामराव पाटील, नेताजीराव पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम,जिल्हा उप रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,विजयराव पाटील,शशिकांत पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने,शहाजी पाटील,अँड.धैर्यशिल पाटील,संग्राम जाधव,इलियास पिरजादे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले,आपण राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षापासून जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियान चालवीत आहोत.आतापर्यंत आपण तालुक्या तील गोर-गरीब कुटुंबांना 44 कोटी 60 लाखांचे अर्थ साहाय्य केलेले आहे.आरोग्य, शिक्षण,स्वयंरोजगार,विविध शासकीय योजना,व्यसनमुक्ती आदी पातळीवरती स्वयंसेवक काम करीत आहेत. आपण गेल्या ६ महिन्यात २४ बालकांच्या साधारण 8-9 लाख रुपयांच्या हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.या कामाची व्याप्ती वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रा.शामराव पाटील म्हणाले,आम्ही आ.जयंतराव पाटील यांच्या आमदार फंडातून तालुक्यातील 90 कर्ण बधिर व्यक्तींना साधारण 13 हजार 500 रुपये किंमतीची श्रवण यंत्रे वाटप करीत आहोत. आम्ही अभियानच्या माध्यमातून 424 हृदय शस्त्र क्रिया,2500 मोतीबिंदू शस्त्रक्रिया,तसेच किडनी,मेंदू मणका आदी शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.आता पर्यंत आम्ही तालुक्या तील 529 छोटे-छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना 29 लाख 45 हजार रूपयांचे अर्थसहाय्य केलेले आहे.
डॉ.नरसिंह देशमुख म्हणाले,आम्ही दिव्यांग व्यक्तींना दाखले देत आहोत. मात्र मध्यंतरी त्यामध्ये खंड पडला होता.आता पुन्हा दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी जिल्हा उपरुग्णालयात दाखले दिले जातील. यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी तालुक्यातील गोर-गरीब कुटुंबांना सर्व स्थरावर आधार देण्याचे काम मा.साहेब व प्रतिकदादा पाटील करीत असल्याचे सांगितले.
दिव्यांग संघटनेचे रामभाऊ पाटील,प्रकाश पवार,संजय कटारे,प्राचार्य दीपा देशपांडे आदींसह इस्लामपूर,आष्टा व तालुक्यातील लाभार्थी तसेच अनेक मान्यवर,अभियानचे संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी समन्वय इलियास पिरजादे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी आभार मानले.संघटक विनायक जगताप यांनी सूत्रसंचालन केले.









































































