Last Updated on 12 Mar 2025 4:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
निवडणुकीच्या काळात नेते इतकी गोड बोलतात की, लोकांना खरंच वाटतं – आता देश बदलेल, गाव सुधारेल, प्रत्येकाच्या आयुष्यात नांदणार आहे सुवर्णयुग! पण प्रत्यक्षात काय होतं? सत्ता मिळाल्यावर हेच नेते जनतेला विसरतात, आश्वासनं धुळीला मिळतात आणि पुन्हा तेच जुनं राजकारण सुरू होतं. मग प्रश्न असा आहे – लोक खरंच मूर्ख आहेत का, की नेते इतके हुशार आहेत की ते जनतेला वेडं बनवतात?
कर्जमाफी, नोकरभरती, महागाई नियंत्रण, आरोग्य सुविधा, रस्ते, वीज, पाणी हे सगळं प्रत्येक निवडणुकीत ऐकायला मिळतं. पण काही अपवाद वगळता, हे शब्द हवेत विरतात. आश्चर्य म्हणजे, लोक पुन्हा त्याच गोडगोड बोलणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवतात!
जनतेच्या विस्मरणाचा फायदा
भारतीय मतदारांचा मोठा दोष म्हणजे ते विसरून जातात. एखाद्या पक्षाने पाच वर्षे काहीही केलं नसलं तरी त्यांना नवीन ‘वचनं’ दिली की लोक पुन्हा भुलतात. सोशल मीडियावर नेत्यांच्या भाषणांवर टाळ्या वाजवल्या जातात, पण आपल्या हक्कांसाठी आवाज उठवायला कुणीच पुढे येत नाही.
जर जनता खरोखरच हुशार असेल, तर तिने ‘शब्दांवर’ नाही, तर ‘कृतीवर’ मतदान करायला हवं. फक्त निवडणुकीच्या आधी नाही, तर पाच वर्षं सतत सरकारला प्रश्न विचारले गेले पाहिजेत. अन्यथा, हे नेते पुन्हा नवे नवे ‘गाजर’ दाखवणार आणि लोक पुन्हा त्याच फसव्या स्वप्नांमध्ये रममाण होणार!
जर लोकांनी ‘थर्ड अंपायर’सारखं काटेकोरपणे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली, तरच खरी लोकशाही टिकेल. अन्यथा, नेते फक्त बोलत राहतील आणि जनता फक्त ऐकत राहील!
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Jan 2026 5:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit सातारा । शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी कृष्णा कारखान्याने मायेच... Read more















































































