Last Updated on 15 Nov 2021 9:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गुजरातमध्ये ATS ची मोठी कारवाई;तीन जणांना अटक
अहमदाबाद |
तब्बल 120 किलो हेरॉईन गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावामधुन जप्त करण्यात आले आहे. अंदाजे सहाशे कोटी रुपये याची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे.विशेष म्हणजे ही कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो नाही तर गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात आली आहे.
गुजरात एटीएसने ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्विट करत दिली आहे. गुजरातमध्ये गेल्या आठवड्यात साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. महिन्याभर आधी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.
एटीएसच्या पथकाने मोरबी जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मुख्तार हुसैन उर्फ जब्बार जोडिया, शमसुद्दीन हुसैन सय्यद आणि गुलाम हुसैन उमर भागड या तिघांना अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती हाती लागली आहे. पाकिस्तानच्या बोटीतून हेरॉइनची खेप आणण्यात आली होती. समुद्रीमार्गे मुख्तार आणि गुलाम यांनी ते गुजरातमध्ये आणले होते. पाकिस्तानमधील झाहिद बशीर बलूच याने हे ड्रग्ज पाठवले होते.
गेल्या आठवड्यातच गुजरातमध्ये 350 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते.महिनाभरापूर्वीच डीआरआयने जवळपास ३ हजार किलो हेरॉइन जप्त केले होते. त्याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये इतकी होती. कच्छमधील मुंद्रा बंदर येथून सप्टेंबरमध्ये हे हेरॉइन जप्त केले होते. अफगाणिस्तानमधून हे ड्रग्ज गुजरातमध्ये आणण्यात आले होते.पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समजते. पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली जात आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.











































































