Last Updated on 10 Jul 2025 3:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या दरम्यान राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा केली आहे. आशिष शेलार यांनी ‘गणेशोत्सव’ हा सण महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे.
आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो. तसेच पीओपी मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.














































































