Last Updated on 19 Mar 2024 3:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
गडचिरोली । जिल्ह्यात सी-60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार प्रमुख नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
आचारसंहिता कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं तेलंगणातील काही माओवादी प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीला गेल्याची माहिती काल दुपारी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांच्या सी-60 पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच, एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.
त्यामुळे नक्षलवाद्यांना सी-60 पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यात चार नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला.
गोळीबाराच्या ठिकाणाहून 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल तसंच नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आलं आहे. या नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र सरकारकडून ३६ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा इनाम जाहीर करण्यात आला होता.









































































